मुंबईतील द्रुतगती महामार्ग अपघातात दोन ठार , Mumbai western express way on accident

मुंबईतील द्रुतगती महामार्ग अपघातात दोन ठार

मुंबईतील द्रुतगती महामार्ग अपघातात दोन ठार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

पश्चिम द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात दोन जण ठार झालेत. बेस्ट बसने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर खार पूर्वेला निर्मलनगरजवळ बेस्टने मोटरसायकलला धडक दिली. यात मोटरसायकलवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 5, 2013, 13:10


comments powered by Disqus