नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, nagnath kottapalle be come president of sahitya samela

नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

नागनाथ कोत्तापल्ले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
www.24taas.com, मुंबई

ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आज (गुरुवार) निवड झाली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ८८९ मतांपैकी नागनाथ कोत्तापल्ले यांना ५८४ मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी ह. मो. मराठे यांना १६४, शिरीष देशपांडे यांना १०४ आणि अशोक बागवे यांना २३ मते मिळाली आहेत. पुढील वर्षी ११ ते १३ जानेवारी दरम्यान चिपळूण येथे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

कोत्तापल्ले यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. मराठी भाषेतील ते ज्येष्ठ लेखक, कवी व समीक्षक आहेत.

First Published: Thursday, November 1, 2012, 16:19


comments powered by Disqus