Last Updated: Tuesday, December 10, 2013, 12:19
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगोव्यात नायजेरियन लोकांनी रस्त्यावर धुमाकूळ घातल्याची घटना ताजी असतानाच मुंबईच्या लोकलमध्येही असाच प्रकार घडला. रविवारी मध्यरात्री विरारला जाणार्या लोकलमध्ये दोन नायजेरियन तरुणांनी गोंधळ घातला आणि त्यानंतर मीरा रोड स्थानकात १० ते १२ प्रवाशांना मारहाणही केली. त्यानंतर खवळलेल्या प्रवाशांनीही या दोघांना प्लॅटफॉर्मवरच बदडून पिटाळून लावलं.
रविवारी मध्यरात्री चर्चगेट ते विरार ही १२.५० वाजताची शेवटची लोकल सुटली. या लोकलच्या चर्चगेटच्या दिशेनं असलेल्या फस्र्ट क्लासच्या डब्यात दारू प्यायलेले दोन नायजेरियन प्रवासी होते. ते शिवीगाळ आणि हातवारे करीत डब्यात धुमाकूळ घालत होते. मध्यरात्री २.०५च्या सुमारास ही लोकल मीरा रोड स्थानकात आल्यावर प्रवासी आणि या दोघा नायजेरियन्समध्ये बाचाबाची झाली. त्याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. यात दोघांनीही १० ते १२ प्रवाशांना अक्षरश: बदडलं. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांनीही या हाणामारीत भाग घेत प्रवाशांना साथ दिली आणि दोन्ही नायजेरियन्सना स्थानकाबाहेर नेऊन बदडलं.
प्रवाशांचा रुद्रावतार पाहून मग या दोघांनीही पळ काढला. कारण मात्र गुलदस्त्यात... या हाणामारीचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. दारू प्यायलेल्या दोन्ही नायजेरियन्सनी डब्यात गोंधळ घातला आणि त्याचा त्रास प्रवाशांना झाला. यावरूनच ही हाणामारी झाल्याचं सांगण्यात येतंय. तसंच या नायजेरियन्सनी त्यावेळी डब्यात असलेल्या महिला प्रवाशांची छेड काढल्याचंही कारण पुढं येत आहे.
हा धुमाकूळ थांबल्यानंतर लोकल विरारसाठी रवाना झाली. मीरा रोड ते नालासोपारा स्थानक येईपर्यंत चार वेळा लोकलच्या डब्यातील चेन खेचण्यात आली. त्यामुळं लोकल २० मिनिटं उशिरा पोहोचल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रवासी आणि दोन नायजेरियन्समध्ये मीरा रोड स्थानकात हाणामारी झाली. याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 10, 2013, 11:45