Last Updated: Thursday, April 17, 2014, 13:00
पुण्यामध्ये शिवाजी नगर भागात मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं समोर आलंय. हजारो मतदारांची मतदान यादीत नावंच नाहीयेत. यात अनेक सेलिब्रेटी मतदारांचाही समावेश आहे. मतदार यादीतील घोळामुळं अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर, गायक-संगीतकार सलील कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, संध्या गोखले यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागतंय.