भाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर, Nana patekar on Ajit pawar Speech

भाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर

भाषण करणं अजितचा स्ट्राँग पाईंट नाही - नाना पाटेकर
www.24taas.com, मुंबई

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याची सर्वच स्तरातून निंदा करण्यात येत आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर अभिनेते नाना पाटेकर यांनी देखील अजित पवारांचे कान टोचले. अजित पवारांना त्यांनी त्यांच्या खास शैलीत सल्लाही दिला.

‘अजितच चुकलं होतं, अजितने त्यांची माफी मागितली होती. पण हे चुकलं हे त्याच्या बोलल्यानंतरच त्याच्या लक्षात आलं असेल, पण काय असतं प्रत्येकाचे काही तरी चांगले गुण असतात. तर अजितने बोलणं, भाषण करणं... हा त्याचा स्ट्राँग पाईंट नाही. त्याचं कदाचित काम करणं असेल. जो आपला स्ट्राँग पॉईंट आहे तिथे आपण आपल्याला सिद्ध करावं.`


`बाकीच्या गोष्टी नाही. आपण अनावधानाने काहीवेळ बोलून जातो, तसं करू नये.. आणि निश्चितपणे शब्द हे तुम्हांला फार विचित्र कुठल्या कुठे नेऊन ठेवतील. वर नेतील खाली नेतील.’ असं म्हणत नाना पाटेकर यांनी अजित पवारांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

अजित पवारांच्या वक्तव्याचा सगळ्यांनीच निषेध केल्यानंतर अजित पवारांनी त्याबाबत माफीही मागितली. मात्र अजित पवारांच्या या वक्तव्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकही चांगलेच आक्रमक झाले. त्यामुळेच नाना पाटेकरने अजित पवारांना हा सबुरीचा सल्ला दिला आहे.

First Published: Tuesday, April 9, 2013, 11:30


comments powered by Disqus