Last Updated: Monday, November 26, 2012, 17:40
www.24taas.com, मुंबई`साहेब नसते तर नारायण कुठेच नसता`, शिवसेनेत असेपर्यंत त्यांच्या प्रत्येक सभा ऐकल्या, त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झालो होतो असं म्हणत उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेमुळं मला संधी मिळाली, बाळासाहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केलं असं सांगत नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंना श्रध्दांजली अपर्ण केली.
आज मंत्रालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यासाठी मंत्रालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. तर भुजबळांनीही यावेळी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
First Published: Monday, November 26, 2012, 17:32