राष्ट्रवादीसोबत नाईलाज म्हणून केलीय युती- राणे, Narayan Rane on NCP for Congress-NCP Coalition

राष्ट्रवादीसोबत नाईलाज म्हणून केलीय युती- राणे

राष्ट्रवादीसोबत नाईलाज म्हणून केलीय युती- राणे
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे... राष्ट्रवादीबरोबरची युती ही निव्वळ तडजोडीची युती आहे असल्याचा हल्लाबोल राणेंनी केला आहे.

`राष्ट्रवादीचं घड्याळ हातावर बांधलं आहे.. राष्ट्रवादीची वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात.` अशी खंत त्यांनी व्यक्त केली.. `शिवाय राष्ट्रवादीसोबत एकत्र येणं म्हणजे नाइलाजास्तव युती केलेली आहे.` असेही राणेंनी म्हटलं आहे...

नारायण राणेंनी आपली नाराजी प्रकटपणे व्यक्त केल्याने, येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस युती करणार का? असाच प्रश्न निर्माणा झाला आहे. या वादाचे नक्कीच परिणाम दिसन येतील. तसंच राष्ट्रवादीच्य़ा एकला चलो रे भूमिकेचाही राणेंनी खरपूस समाचार घेतला...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 31, 2013, 10:51


comments powered by Disqus