Last Updated: Monday, January 13, 2014, 16:51
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्लीराष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची तयारी सुरू झाली असून लोकसभेसाठी १८ उमेदवारांची यादी येत्या बुधवारी जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापैकी १४ नावे निश्चित झाले असून ४ नावांवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहे. काँग्रेसच्या वाटेला २६ आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला २२ जागा असे जागा वाटप निश्चित झाल्याचे समजून राष्ट्रवादी कामाला लागली आहे. एकीकडे काँग्रेसशी या जागावाटपाबाबत चर्चा झालेली नसतानाही आपल्या परीने संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. २२ पैकी काही मतदार संघांची अदालाबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता एकूण १८ जागांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असून त्या पैकी १४ जागांसाठीच्या उमेदवारांची निश्चित करण्यात आली असून ४ जागांवरील उमेदवारांची चर्चा सुरू आहे.
मागील आठवड्यात शरद पवार यांनी या संदर्भात आढावा घेतला आणि उमेदवारांची चर्चा केली. त्यानुसार आज पुन्हा झालेल्या बैठकीत २२ पैकी १४ जणांची नावे निश्चित झाली आहेत. पहिल्या यादीतील ४ नावे अजून निश्चित करायची बाकी आहे. इतर चार जागा म्हणजे २२ पैकी १८ जागांवर उमेदवार दिल्यानंतर उर्वरित ४ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात येणार नाही. भविष्यात या चार जागांची काँग्रेससोबत आदलाबदल होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १४ नावे निश्चित केले असून ४ जागांसाठी दोन किंवा त्या पेक्षा अधिक उमेदवारांची चर्चा होत आहे. त्यामुळे उद्या पर्यंत शरद पवार नावे निश्चित करणार असून परवा म्हणजे बुधवारी १८ जणांची यादी पवार स्वतः जाहीर करतील अशी शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येते आहे.
दरम्यान, ६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर काही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली होती. यातील आता १४ नावे निश्चित करण्यात आली आहे. या १४ जणांच्या नावांची अजून प्रतिक्षा आहे. पाहा काय नावे होती संभाव्य यादीत....
६ जानेवारीची राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार - उदयनराजे भोसले - सातारा
- छगन भुजबळ - नाशिक
- प्रफुल्ल पटेल - भंडारा गोंदिया
- लक्ष्मण जगताप - मावळ
- संजीव नाईक - ठाणे
- आनंद परांजपे - कल्याण
- अरूण गुजराथी - जळगाव
- रवींद्र पाटील - रावेर
- सूर्यकांता पाटील - हिंगोली
- विजय भांबळे - परभणी
- संजय दीन पाटील - मुंबई उत्तर पूर्व
- पद्मसिंह पाटील - उस्मानाबाद
- धनंजय महाडीक - कोल्हापूर
- सुप्रिया सुळे - बारामती
- जयंत पाटील - हातकणंगले
- जयदत्त क्षीरसागर - बीड
- रमेश आडसकर - बीड
- सुरेश धस - बीड
- विजयसिंह मोहिते पाटील - माढा
- राम राजे निंबाळकर - माढा
- बबनराव पाचपुते - अहमदनगर
- राजीव राजळे - अहमदनगर
- मधुकर पिचड - दिंडोरी
- ए.टी. पवार - दिंडोरी
- राजेंद्र गवई - अमरावती
- दिनेश बूब - अमरावती
- गुणवंत देवकरे - अमरावती
- राजेंद्र शिंगणे - बुलडाणा
- रेखाताई खेडकर - बुलडाणा
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 13, 2014, 16:45