Last Updated: Friday, October 25, 2013, 12:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेने जोगेश्वरीत सुरू केलेले अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर वादाच्या भोव-यात सापडलंय. वैद्यकिय उपचारासाठी अत्याधुनिक सोई सुविधांनी सुसज्ज अशा या ट्रॉमा सेंटरला दिलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या नावाला राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला आहे.
हिंदूहृदयसम्राट ही शिसेनेची घोषणा असून तो त्यांचा राजकीय अजेंडा आहे त्यामुळे यासाठी जनतेच्या पैशाचा वापर करणं चुकीचं असल्याचं राष्ट्रवादीचेनेते नवाब मलीक यांनी सांगीतलंय. आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध नसून हिंदुहृदय सम्राट या नावाला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट करत आयुक्तांनी याची दखल घेऊन हे नाव रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
जोगेश्वरी येथे जे ट्रॉमा केअर रुग्णालय उभारले आहे, त्यात डॉक्टर नाहीत, इतर स्टाफ नेमला नाही आणि मशीनही नाहीत. त्यामुळे या रुग्णालयचा फायदा रुग्णांना होणे दूरच राहिले आहे. मात्र, या रुग्णालयाच्या माध्यमातून शिवसेना आपला राजकीय अजेंडा राबवत आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
कांदिवली येथील क्रीडा संकुलाला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याला शिवसेनेने विरोध केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केलाय. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी या संकुलाला सचिनचे नाव न देता लिटील मास्टर सुनील गावस्कर यांचे नाव देण्याचे पत्र एमसीएला दिले आहे. ते एमसीएचे सदस्य आहेत.
शिवसेनेला टार्गेटकरून राष्ट्रवादीने आपला रोख काँग्रेसकडून वळवल्याचे दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते पवार यांनी काँग्रेसबाबत टीका करताना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळेच राष्ट्रवादी शिवसेनेकडे वळल्याचे दिसत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, October 25, 2013, 08:08