मुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार ncp not fight against munde family candi

मुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार

मुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे बीड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी मुंबईत एनसीपीए इथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय.

या शोकसभेला शरद पवार, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 10:14


comments powered by Disqus