Last Updated: Saturday, March 9, 2013, 00:14
www.24taas.com, मुंबई२०१४ विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मात्र आतापासूनच जुंपली आहे.
जागा वाटपाच्या मुद्दावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. आगामी विधानसभा निवणुकीत 145 जागांची मागणी करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधारावर राष्ट्रवादीनं ही मागणी केल्याची माहिती राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वसंत वाणी यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 130 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीवर आता काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे लक्ष्य लागलं आहे.
First Published: Saturday, March 9, 2013, 00:14