काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात ncp wants more seats then congress for vidhansabha

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात

काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला जास्त जागा हव्यात

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी जास्तच जास्त जागांची मागणी करणार आहे, असं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

लोकसभेचे निकाल लक्षात घेतले तर, राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती मजबूत आहे. म्हणून राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे, तर राष्ट्रवादीनं चार जागा पटकावल्या आहेत.

आता आघीडमध्ये जागा वाटपावरुन पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसला कोंडीत पकडण्याची राष्ट्रवादीची ही खेळी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 16, 2014, 17:10


comments powered by Disqus