Last Updated: Friday, June 20, 2014, 18:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.
मुख्यमंत्री बदलाबाबत राष्ट्रवादीची कोणतीही भूमिका नाही. कुठल्याही व्यक्तीचं नाव राष्ट्रवादी पुढं करणार नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलंय. तर विधानसभा निवडणुकीत राज्यातील आघाडीच्या प्रचाराचं नेतृत्व मी करावं, असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं असल्याची माहिती देखील पवारांनी दिलीय.
याबाबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात आज शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. आर. आर. पाटील, छगन भुजबळ हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री बदलाबाबत सोलापुरात सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, मला काहीच माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं
म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र लोकांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 20, 2014, 18:38