Last Updated: Monday, April 15, 2013, 09:03
www.24taas.com, मुंबईमुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो तरुणींना बीएमसी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसलाय. या तरुणींना संपूर्ण रात्र फुटपाथवर काढावी लागली.
आज या तरुणींची मुलाखत आहे. यासाठी राज्यभरातून अनेक तरुणी कालच मुंबईत दाखल झाल्यात. मात्र त्यांच्या राहण्याची काहीच व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने अखेर त्यांना रात्रभर मुंबईतल्या फुटपाथवर मुक्काम करावा लागला.
मुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या मुलींची काळजी घेतली ती सामाजिक संस्थांनी. काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या तरुणींच्या सुरक्षेसाठी जागता पाहारा दिला.
First Published: Monday, April 15, 2013, 08:56