Last Updated: Sunday, October 20, 2013, 23:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई महिनाभर जास्त काळ थांबलेल्या पावसाने निरोप घेताच घामाच्या धारांनी मुंबईकरांना बेजार केलंय.
पावसाची पाठ वळताच ऑक्टोबर हीटनं मुंबईकर हैराण झालेत. गेल्या पाच दिवसांत मुंबईतील कमाल तपमानामध्ये तब्बल सहा अंशांची वाढ झालीय. उत्तर भारतातून माघारी परतल्यावर मान्सूनचा महाराष्ट्रातला मुक्काम महिनाभरासाठी वाढला होता. त्यामुळे राज्यासह मुंबईकरांना ऑक्टोबर हिटपासून काही काळ दिलासा मिळाला मात्र मान्सूनची पाठ वळताच मुंबईत उकाड्याचा त्रास जाणवू लागलाय.
येत्या काही दिवसांत तापमान वाढणार असल्यानं मुंबईकरांना आता काळजी घ्यावी लागणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 20, 2013, 23:13