घरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!, Offers for foreign tour and car over real estate

घरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!

घरासोबत परदेश प्रवास आणि कारची ऑफर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिवाळीला नवीन घर बुकिंग करण्याकडं ग्राहकांचा कल नेहमीच राहिलाय. परंतु रियल इस्टेटमध्ये असलेल्या मंदीमुळं मुंबई आणि परिसरातील अनेक गृहप्रकल्प ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी विविध आमीषे दाखवत आहेत. ग्राहकांना कार भेट देण्यापासून परदेशी पॅकेज टूरही दिल्या जातायत.

गेल्या काही दिवसांपासून रियल इस्टेट क्षेत्रात मंदीचे वातावरण दिसत असले आणि घरांना मागणी नसली तरी घरांच्या किंमती मात्र तसूभरही कमी झालेल्या नाहीत. एमएमआरडीए क्षेत्रात बिल्डरांकडून सुमारे 1 लाख 40 हजार घरांचा पुरवठा होतोय, परंतु या घरांना ग्राहकच मिळत नाहीयत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आपल्याकडं वळविण्यासाठी बिल्डर्स जिवाचे रान करताना दिसतायत. दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण नव्या घरांचे बुकींग करतात. त्यामुळं अनेक बिल्डर्सकडून दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विविध प्रकारची आमीषे दाखवली जातायत. काही बिल्डर्स फोर व्हीलर गाडी, सोने-चांदीची नाणी, बाईक भेट देतायत. काहीजण स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी भरण्याची जबाबदारी स्वीकारत आहेत. क्लब मेंबरशीप आणि परदेशी पॅकेज टूरही दिल्या जातायत.

प्रमोशनल इन्सेटिंव्हच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्याकडं वळविण्याचा प्रयत्न होत असला तरी घरांच्या किंमती कमी करण्याकडं कल मात्र बांधकाम व्यावसायिकांचा दिसत नाहीय.

ग्राहकांवर विविध प्रकारे बक्षिसांची खैरात केली जात असली तरी मुंबईतील घरे मात्र सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळं नवी मुंबई, वसई-विरार आणि ठाण्याच्या पुढे असणा-या गृहप्रकल्पांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती दिसून येतंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 27, 2013, 18:45


comments powered by Disqus