Last Updated: Wednesday, October 17, 2012, 10:55
www.24taas.com, वाशी हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरला चिटकून एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रेल्वेची हार्बर लाईनवरची वाहतूक विस्कळीत झालीय.
वाशीमध्ये बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडलीय. रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. वीजप्रवाह सुरू असलेल्या ओव्हरवायरला टिकल्यानं या प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे हार्बर लाईनवरील अनेक गाड्या तात्काळ रद्द करण्यात आल्या.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे ऑफिसला निघालेल्या प्रवाशांची मात्र एकच तारांबळ उडालीय. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे हार्बर स्टेशन प्रवाशांची एकच गर्दी दिसतेय.
First Published: Wednesday, October 17, 2012, 10:53