Last Updated: Friday, August 30, 2013, 16:48
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईआज मुंबईत दहीहंडीदरम्यान विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दहीहंडीसाठी निघालेल्या एका गोविंदाचा मोटर सायकल अपघातात मृत्यू झाला आहे. संकेत सिद्धार्थ मोहिते असं या तरुणाचं नाव आहे.
संकेत आपल्या मित्रांसोबत दंहीहंडी पाहाण्यासाठी मोटरसायकलवरून वडाळ्याहून बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सला जायला निघाला होता. यावेळी मोटर सायकलला अपघात झाला. जखमी झालेल्या संकेतला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.
संकेतच्या छातीला तसंच डोक्याला जबरदस्त मार बसल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सायन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 23:31