पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीसpankaja munde will be in BJP coar camitee

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस

पंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय.

तसंच यापुढे पंकजा मुंडे कोअर कमिटीत असणार आहे. तसंच महाराष्ट्रात पंकजा मुंडेंची महत्त्वाची भूमिका असेल असं भाजपचे देशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. शिवाय पंकजा यांना केंद्रात मंत्रीपद मिळावं यासाठी विनंती करणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रथमच ही बैठक झाली.

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रीपदाच्या पोटनिवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 17:55


comments powered by Disqus