असे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटलीPipeline burst in Kalyan, MIDC take action against MMRDA

असे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली

असे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली
www.24taas.com, झी मीडिया, कल्याण

नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

कल्याणच्या खोणी गावाजवळून जाणारी १७६२ इंच व्यासाची ही पाईप लाईन आहे.
कल्याण कर्जत महामार्गावर सद्या एमएमआरडीएकडून रस्ता बनवण्याचं काम सुरु आहे. त्याठिकाणी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रस्त्याचे काम करतांना जेसीबीनं पाईप लाईनचा व्हॉल्व्ह फोडला. त्यामुळं संपूर्ण परिसर जलमय झाला.

या घटनेमुळं नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही. गेल्या २ महिन्यातली अशाप्रकारची ही दुसरी घटना असून एमएमआरडीचे रस्ते बनवणाऱ्या ठेकेदारांवर एमआयडीसी आता कायदेशीर कारवाई करणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013, 17:24


comments powered by Disqus