अरबी समुद्रात शिवस्मारकाची जागा निश्चित! Place for Shivaji Smarak

अरबी समुद्रात शिवस्मारकाची जागा निश्चित!

अरबी समुद्रात शिवस्मारकाची जागा निश्चित!
www.24taas.com, मुंबई

अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाची जागा निश्चित झाली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीपासून साडेतीन किलोमिटर अंतरावर हे स्मारक असणार आहे.

16 हेक्टर जमिनीवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे. समुद्रात मातीचा भराव टाकून हे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित स्मारकाच्या जागेची पाहणी केली. स्मारकासाठी तब्बल 25 परवानग्यांची गरज लागणार आहे.


केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची महत्वाची परवानगी मिळवावी लागणार आहे. येत्या 2 एप्रिलला पर्यावरणमंत्री मुंबईत येणार आहेत. त्यावेळी मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:25


comments powered by Disqus