पबवर धाड, पोलीस अपुरे २०० तरूण-तरूणी पळाल्या, police in colaba pub

पबवर धाड, पोलीस अपुरे २०० तरूण-तरूणी पळाले

पबवर धाड, पोलीस अपुरे २०० तरूण-तरूणी पळाले
www.24taas.com, मुंबई

पबमध्ये तरूणांचा धागंडधिंगा हा काही आता नवीन राहिलेला नाही. काल पोलिसांनी कुलाब्यातील एका पबवर धाड टाकली. मात्र अपुरा पोलिसांचा फौजफाटा यामुळे २०० तरूण-तरूणींनी धूम ठोकली. पबवर धाड टाकणाऱ्या पोलिसांची संख्या कमी असल्य़ाने ही घटना घडली आहे.

या तरूणांना पुन्हा जेरबंद करण्यासाठी पोलिस सीसीटीव्हीचा आधार घेणार आहेत. मात्र पोलिसांनी धाड टाकल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना ताब्यात घेतल्यानंतरही जादा कुमक का मागवली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पबमधून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचं तक्रार दाखल करण्याचं काम सुरू असतांना, या तरूण-तरूणींनी गोंधळ घातल्याने पोलिसांची भंबेरी उडाली, त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्नही झाला. पण पोलिसांच्या अपुऱ्या बळामुळे ताब्यात घेतलेल्या मंडळीला धूम ठोकणं सोप गेलं. या प्रकऱणी पब मालकाविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

First Published: Saturday, October 27, 2012, 14:10


comments powered by Disqus