मुंबईत हुक्का पार्लरवर पोलीस छापा Police raid on hukkah parlour

मुंबईत हुक्का पार्लरवर पोलीस छापा

मुंबईत हुक्का पार्लरवर पोलीस छापा
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या गोरेगावमध्ये इगल हुक्का पार्लरवर पोलिसांच्या समाजसेवा शाखेनं छापा मारून 47 जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 9 मुली आणि 32 तरूणांचा समावेश आहे.

यातील बहुतांश हे श्रीमंत कुटुंबातील तरूण-तरूणी आहेत. याठिकाणी अवैधरित्या हुक्का पार्लर चालवलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत याठिकाणाहून 47 जणांना ताब्यात घेतलं.

अशा प्रकारच्या कारवायांसाठी वसंत ढोबळे प्रसिद्ध होते. मात्र नुकतीच त्यांची वसंत ढोबळे यांची समाजसेवा शाखेतून बदली करण्यात आली आहे..वसंत ढोबळे आता वाकोला डिवीजनचे एसीपी बनवण्यात आले आहेत. त्यांच्या बदलीमुळं नाईट पार्टी करणा-या तरूणांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. ढोबळे यांच्या बदलीमुळे समाजसेवा शाखेवर जबाबदारी होती. मात्र गेल्या दोन वर्षात ढोबळे यांनी निर्माण केलेला दरारा कायम राखण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असल्याचं दिसून आलं आहे.

First Published: Sunday, September 23, 2012, 12:13


comments powered by Disqus