Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:43
www.24taas.com, मुंबईआसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे म्यानमार येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.
इस्लाम संस्कृतीचा प्रचार करणाऱ्या रझा अकॅडमी या संघटनेने असा हिंसक पवित्रा घेतला आहे. या संघटनेला जमैतुल उललमा आणि जमाते रझा-इ-मुस्तफा या संघटनाचा पाठिंबा आहे.
त्यामुळे दंगलीचेच स्वरुप प्राप्त झालं. हिंसक जमावाने दगडफेक केली.. जमवाला पांगविण्याणसाठी पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराचे नळकांडेही फोडले. या हिंसेचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. सीएसटी स्थानकावरुन निघणाऱ्या हार्बर लाईनच्या सर्व लोकल्सस थांबविण्यात आल्या आहेत.
First Published: Sunday, August 12, 2012, 06:43