24taas.com - pvr multiplex on backfoot

सेना-मनसेसमोर मल्टिप्लेक्सनं टाकली नांगी...

सेना-मनसेसमोर मल्टिप्लेक्सनं टाकली नांगी...
24taas.com, मुंबई

कलावंत आणि सेना-मनसे चित्रपट सेनेच्या आंदोलनासमोर अखेर पीव्हीआर मल्टिप्लेक्सनं अखेर माघार घेतलीय.

१५ ऑगस्टला रिलीज होणाऱ्या बहुचर्चित `एक था टायगर` सिनेमासाठी नुकत्याच रिलीज झालेल्या `भारतीय` या मराठी सिनेमाला पीव्हीआर मल्टीप्लेक्समधून बाहेरची वाट दाखवण्याचा घाट मल्टिप्लेक्स मालकांकडून सुरू होता. आज कलावंतांनी शिवसेना आणि मनसे चित्रपट सेनेच्या नेतृत्वात मल्टिप्लेक्सवर काढलेल्या मोर्चानंतर मात्र मल्टिप्लेक्स मालकांनी माघार घेतलीय.

‘एक था टायगर’च्या रिलीजचा ‘भारतीय’च्या खेळांवर परिणाम होणार नाही, अशी ग्वाही मल्टिप्लेक्समालकांनी दिल्याचं मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी सांगितलंय.

First Published: Monday, August 13, 2012, 16:14


comments powered by Disqus