`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`, R R patil on chaos after munde`s last

`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`

`मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेत वारंवार केला बदल म्हणून...`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अंत्यसंस्कार यात्रेच्या मार्गात वारंवार बदल केल्यानंच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटलंय.

तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या दिल्लीत झालेल्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याबाबत राज्य सरकारला काहीही हरकत नसल्याचंही गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. लवकरच सीबीआय चौकशीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिलीय.

बुधवारी, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना मुखाग्नी दिल्यानंतर परळीत अंत्यविधी ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी जाळपोळ, दगडफेक केल्याच्या घटना घडल्या होत्या. परळीत उपस्थित जमावानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, आर.आर.पाटील, छगन भुजबळ, राज ठाकरे अशा दिसेल त्या नेत्यांना घेरून गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 5, 2014, 12:26


comments powered by Disqus