Last Updated: Saturday, October 27, 2012, 09:30
www.24taas.com, मुंबई `काँग्रेस म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं आहे` हे कोणा सामान्य माणासाचं वाक्य नाही. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काँग्रेसवर उधळलेली स्तुतीसुमनेच म्हणावी लागतील.
काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष असल्याने, अवघड जागचं दुखणं झालं आहे, अशी टीका आबा पाटीलांनी केली आहे. एकेकाळी काँग्रेसमध्ये इंग्रजाच्या विरोधात लढणाऱे, त्यासाठी तुरूंगवास भोगणारे कार्यकर्ते होते. आजच्या घडीला मात्र भ्रष्टाचारासाठी तुरूंगात जाणारे नेतेच काँग्रेसमध्ये जास्त आहेत.
असा टोलाही आर आर पाटील यांनी लगावला. डहाणू नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी आर आर पाटील डहाणूमध्ये आले होते. त्यावेळी आर आर पाटील यांनी काँग्रेसचा पुरेपुर समाचार घेतला.
First Published: Saturday, October 27, 2012, 09:22