मोटारसायकल शोरुममागे सुरू होता हुक्का पार्लर, raid on hukka parlor

मोटारसायकल शोरुममागे सुरू होता हुक्का पार्लर...

मोटारसायकल शोरुममागे सुरू होता हुक्का पार्लर...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील डॉकयार्ड रोडमधील डायमंड हुक्का पार्लरवर पोलिसांनी रात्री छापा टाकून ४४ जणांना ताब्यात घेतलंय.

विशेष म्हणजे हा हुक्का पार्लर एका मोटारसायकल शोरूमच्या मागे सुरू होता आणि या पार्लरमध्ये जाण्याचा रस्ता थेट मोटारसायकलच्या शोरूममधून होता. छाप्यात पोलिसांनी अनेक फ्लेवरच्या विदेशी तम्बाखू आणि हुक्क्याचे मॉडेल हस्तगत केलेत.

याबाबत या हुक्का पार्लरच्या आणि मोटारसायकल शोरूमच्या मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 09:40


comments powered by Disqus