Last Updated: Friday, June 20, 2014, 19:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअच्छे दिन आने वाले है या आशेवर मुंबईकरांनी नरेंद्र मोदींना मतदान केले. पण, मुंबईकरांच्या खिशाला चाट लावणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. मुंबईकरांच्या पासच्या किंमतीत सुमारे दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
पाहूया चर्चगेट आणि सीएसटी प्रवासाचा दर ग्राफिक्सच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.
त्यामुळं आता सामान्यांसाठी अच्छे दिन कधी येणार असा प्रश्न पुन्हा विचारला जातोय. कारण रेल्वेच्या भाडेवाढीचा `बॉम्ब` आज देशभरातील रेल्वे प्रवाशांवर टाकण्यात आला आहे. प्रवासी भाड्यात १४.२ तर माल भाड्यात ६.५ टक्के एवढी मोठी वाढ करण्यात आली असून 25 जूनपासून हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत.
रेल्वे भाडेवाढीचे वृत्त `पीटीआय` या वृत्तसंस्थेनं दिलं असून रेल्वे अर्थसंकल्पाच्या आधीच झालेली ही भाडेवाढ म्हणजे लाखो प्रवाशांसाठी महागाईच्या आगीत तेल ओतणारीच ठरणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 20, 2014, 19:34