Last Updated: Saturday, February 15, 2014, 13:04
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईवीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.
मुंबईच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी सुरु झाल्या आहेत. मुंबई, कल्याण, ठाणे, बोरिवली, मालाड ठिकाणी पाऊस पडत आहे. शिवाय मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली आहे. काल मुंबईतल्य़ा बोरिवली, बांद्रा, जुहू परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसंच नवी मुंबईतही काही ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा होता.
तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात पावसानं हजेरी लावली. पावसामुळे दिल्लीतल्या रस्त्यांरस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळालं. त्यानंतर आजही मुंबईत काही भागात पावसाच्या सरी पडत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 12:52