पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा,Rain in Mumbai-Maharashtra, Warning fishermen

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यात पावसानं कमबॅक केले आहे. आणखी 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितले आहे. परतीच्या पावसावेळी मान्सून सक्रिय झाल्याची ही पहिलीच वेळ असल्याचं हवामान तज्ज्ञांचं मत आहे.

दरम्यान, मुंबई आणि उपनगरासह महाराष्ट्रात चांगला पाऊस होत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून वादळी वा-यासह परतीच्या पावसानं नाशिकला झोडपून काढलंय. धरण क्षेत्रांत चांगला पाऊस झाल्यानं नासर्डी, गोदावरी, वालदेवी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढलीय. नाशिक शहराची तहान भागवणा-या गंगापूर धरणातला पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचलाय. तर दारणा धरण १०० टक्के भरलंय. गंगापूर मधून दुपारी दोन वाजता ८ हजार ८०० कुसेक्स पाणी सोडण्यात आल्यानं गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली गेली होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 12:45


comments powered by Disqus