Raj and r.r. patil, 24taas.com

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`
www.24taas.com, मुंबई

राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे. मात्र मोर्चा काढणारच असतील तर त्यांना रोखणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई दंगलीतल्या आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी निक्षून सांगितलं. परदेशातील मृतदेहांच्या छायाचित्रांचा वापर करत विशिष्ट समाजाला भडकाविण्याचा प्रयत्न होत असल्याचं उघड झाल्याचंही आर. आर. पाटलांनी सांगितलं.

मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

First Published: Sunday, August 19, 2012, 18:46


comments powered by Disqus