आपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे..., raj thackeray got angry to watch his poster on public toilet

आपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे...

आपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे...

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच आपलं एखादा पोस्टर पाहून भडकल्याचं समजतंय. कारण, त्यांचं हे पोस्टर कांदिवलीच्य पश्चिम भागातील एका एअरकंडिशन असणाऱ्या पब्लिक टॉयलेटच्या बाहेर लावण्यात आलं होतं.

या पोस्टरवर राज ठाकरे स्वच्छतेसाठी लोकांना जागरूक करताना दिसत आहेत. हे पोस्टर पाहिल्यानंतर मात्र राज ठाकरेंचा पारा चढला आणि त्यांनी हे पोस्टर तिथून हटवण्याचा तत्काळ आदेश देऊन टाकला.

मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या एका पुस्तकाच्या लॉन्चिंगवेळी बोलताना राज ठाकरेंनी या प्रकरणाची टर उडवली. ‘टॉयलेटला जाणाऱ्या लोकांना हे खूप विचित्र वाटत असेल... त्यांना वाटेल की मी त्यांच्यावर नजर ठेवतोय’ असं म्हणत राज ठाकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

यानंतर दरेकर यांनी राज ठाकरेंसोबत आपलाही फोटो त्या पोस्टरवरून हटवण्यासंबंधीच्या सूचना दिलाय. पण, मनसेचे कार्यकर्ते मात्र या निर्णयामुळे खूश नाहीत... त्यांच्या म्हणण्यानुसार, या पोस्टरमुळे लोकांवर सकारात्मक परिणाम झाला असता आणि समाजात एक चांगला संदेश गेला असता.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 11:32


comments powered by Disqus