Last Updated: Friday, May 24, 2013, 15:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यात असणारे मैत्रीचे संबंध नेहमीच दिसून आले आहेत. याबाबत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील राज आमचे मित्र आहेत असं म्हंटलं आहे. आमचे राजकीय आणि कौटुंबिक संबंध वेगळे आहेत. ते आमचे कौटुंबिक मित्र आहेत. आम्ही नेहमी त्यांना भेटतो.
राज यांना आपण भेटतो, गप्पा मारतो, असे सांगून नितेश म्हणाले की, राजकारणात मात्र मनसेचा इफेक्ट मुंबई, पुणे आणि थोडेफार नाशिक इथे दिसेल. त्याला कारण राज यांचा करिश्मा आणि स्थानिक आमदारांची व्यक्तिगत ताकद आहे. पण शिवसेनेत शिवसैनिकांची झाली तशी मनसे कार्यकर्त्यांची ओळख निर्माण झालेली नाही.
हक्काने ज्यांच्याकडे धाव घ्यावी असे जाळे तयार झालेले नाही. राज ठाकरेंना एकट्यालाच सगळे ओढावे लागत आहे. मी सध्या ‘स्वाभिमान’च्या माध्यमातून सामाजिक विषय हाती घेतले आहेत. त्यावर काम करत नेटवर्क वाढवणे सुरू आहे. पण दुसरीकडे मी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 24, 2013, 15:07