चिंटू शेख गोळीबार प्रकरण : राणेंना दिलासा

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 18:46

चिंटू शेख गोळीबार प्रकरणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना दिलासा मिळालाय.

छोटे राणे निवडणूक लढवणार नाही!

Last Updated: Sunday, April 27, 2014, 10:31

नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटवरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय.

शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

Last Updated: Thursday, February 20, 2014, 19:05

शिवसेना कार्यकर्ते आणि नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वरळीत तुंबळ हाणामारी झाली. कामगार संघटनांवरून हा राडा झाला. यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज केला.

नितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:53

टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.

`राणे` समर्थक गुंडांनी मुंबईत केली गाड्यांची तोडफोड?

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 11:01

मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करत तोडफोड केली. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 07:56

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.

राणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 22:26

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

`जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का?`

Last Updated: Saturday, October 12, 2013, 20:16

स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मनोहर जोशींवर तोंडसुख घेतलंय. `जोशींना दादरमध्ये तरी कुणी ओळखतं का? असा सवाल करत नितेश यांनी जोशींवर टीका केलीय.

चिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे

Last Updated: Thursday, September 26, 2013, 15:23

चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही - नितेश राणे

Last Updated: Saturday, September 7, 2013, 13:54

आपण कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही. त्यामुळे कुणाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दात स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी गुजराती समाजाचा इशारा धुडकावून लावला आहे.

`राणे बिनशर्त जाहीर माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा`

Last Updated: Saturday, September 7, 2013, 10:03

उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि गुजरात समाजातला तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. नितेश राणेंनी मुंबईतील गुजराती समाजाबद्दल केलेल्या विधानांसंदर्भात बिनशर्त जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा गुजराती समाजानं दिलाय.

रिक्षा संप, राव राणे आमनेसामने

Last Updated: Saturday, August 17, 2013, 18:20

२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.

नारायण राणेंचा टोला आणि कानपिचक्या!

Last Updated: Monday, August 5, 2013, 18:40

नरेंद्र मोदींचा उदोउदो कऱणा-यांनी गुजरातमध्ये निघून जावं, असं म्हणत नारायण राणे यांनी मोदी समर्थकांना टोला लगावलाय.

माझी टीका गुजरात्यांवर नाही, तर मोदींवर- नितेश राणे

Last Updated: Saturday, August 3, 2013, 17:04

गुजराती समाजाबाबत ट्विटरवरुन केलेल्या टीपण्णीवर स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे ठाम आहेत. गुजराती समाजाबाबत काही आक्षेपार्ह विधान ट्विटरवर केलं नसल्याचा खुलासा राणे यांनी केलाय.

मोदींची स्तुती करायचीय, मुंबई सोडा – नितेश राणे

Last Updated: Friday, August 2, 2013, 18:49

मुंबईत राहून नरेंद्र मोदींची स्तुती करायची असेल आणि गुजरातचं गुणगान करायचं असेल तर आधी मुंबईतून चालते व्हा, असा सज्जड दम स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी मुंबईतल्या गुजराती समाजाला दिलाय.

राज ठाकरे तर आमचे मित्र - नितेश राणे

Last Updated: Friday, May 24, 2013, 15:09

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यात असणारे मैत्रीचे संबंध नेहमीच दिसून आले आहेत. याबाबत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील राज आमचे मित्र आहेत असं म्हंटलं आहे.

कलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश

Last Updated: Thursday, April 25, 2013, 12:52

शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

राज ठाकरे बोलबच्चन, राणे-राज संघर्षाची ठिणगी....

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 12:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खेडमध्ये टीका केल्यानंतर उद्योगमंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी राजविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे.

नाटकाला नकार नितेश राणेंचा अतुल कुलकर्णींवर `प्रहार`

Last Updated: Saturday, February 2, 2013, 15:38

नितेश राणे म्हणजे एक वादातलं नाव. मुंबईत काढलेल्या हंडा मोर्चावेळी झालेली हाणामारी असेल किंवा पार्किंगमध्ये घातलेला गोंधळ.

'स्वाभिमान'च्या इमरानने घेतले एकाचे प्राण

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 08:31

उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या घाटकोपर भागाचा अध्यक्ष इमरान शेखनं काल रात्री दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. इम्तियाज शेख आणि हुसैन शेख अशी हल्ला झालेल्या दोघांची नावं आहेत.

कुलगुरू प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

Last Updated: Thursday, April 5, 2012, 19:10

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांना हटवण्यासाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. कुलगुरूंना पदावरुन हटवावं या मागणीसाठी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा राज्यपालांची भेट घेतली.

राज्यपाल कुलगुरूंवर नाराज

Last Updated: Thursday, April 5, 2012, 08:45

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर आणखीनच अडचणीत सापडले आहेत. राज्यपाल वेळुकर यांच्या कारकिर्दीबाबत नाराज आहेत. त्यातच वेळूकर यांनी नितेश राणे यांची भेट घेतल्यानं नाराजीच आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे राज्यपाल कुलगुरू विद्यापीठ यांचा राजीनामा घेण्याची शक्यता आहे.

कुलगुरूंच्या पाठीशी आता काँग्रेस-राष्ट्रवादी

Last Updated: Friday, March 30, 2012, 17:21

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्वाभीमान संघटनेचे नेते नितेश राणेंनी कुलगुरू राजन वेळूकरांची भेट घेऊन घोळासंदर्भात माहिती घेतली. तसंच कुलगुरूंच्या पाठिशी घालत युवासेना विनाकारण राजकारण करत असल्याचा आरोप केलाय.

नितेश राणेंचा अजितदादांना इशारा

Last Updated: Saturday, February 4, 2012, 17:25

द्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.

राणेंचा 'राजकिय वारस' कोण?

Last Updated: Sunday, January 29, 2012, 19:31

झी २४ तासचे गेस्ट एडिटर म्हणून आलेल्या नारायण राणे यांनी दिलखुलास संवाद साधला. झी २४ तासच्या दिलखुलास चर्चेत त्यांनी पुढची राजकीय गणितंही उलगडली. नारायण राणे यांना त्यांचा राजकिय वारस कोण असणार या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी झी २४ तास समोर नवा खुलासा केला आहे.

‘शिव वडापाव’ही झाका - नीतेश राणे

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 16:42

उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने मायावतींचे निवडणूक चिन्ह असलेल्या हत्तींना झाकण्याची कारवाई करण्यात आली, त्याच धर्तीवर शिवसेनेच्य ‘शिववडा या वडापावच्या गाड्यांवरील नावांवरही स्टिकर्स लावण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

युतीविरोधात 'स्वाभिमान'चा सिनेमा

Last Updated: Saturday, January 7, 2012, 22:51

मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या विरोधात प्रचारासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे सज्ज झालेत. महापालिकेतील युतीच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी नितेश यांनी मुंबईतल्या पाणी टंचाईवर लक्ष केंद्रीत केलंय.

नितेश राणेंनी पराभवाचं खापर फोडलं पोलिसांवर

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 14:23

सिंधुदुर्गात झालेल्या दणदणीत पराभवानंतर आता त्या पराभवाचे आत्मचिंतन करणार असल्याचं स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी सांगितलं आहे. राणे यांना हा पराभव अत्यंत जिव्हारी लागला आहे.

'अपंगांनी जास्त बोलू नये'- नितेश राणे

Last Updated: Monday, November 28, 2011, 11:45

राणे विरूद्ध परब याच्यातील वाद शिगेला, नितेश राणेंनी केली जयवंत परब यांच्यावर टीका, अपंगांनी जास्त त्यांनी बोलू नये, धड चालता येत नाही त्यांनी राणे साहेबांविषयी बोलू नये,'भुंकणारे कुत्रे कधी चावत नाही'.

राणे विरूध्द ठाकरे पुन्हा एकदा

Last Updated: Sunday, October 2, 2011, 12:18

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. वरळीत गाडी ओव्हरटेक करण्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर हा वाद वरळी पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला.