राज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज, Raj Thackeray news in saamana

राज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज

राज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज

www.24taas.com,मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिलीये. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापलीये. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना सामनात प्रसिद्धी मिळत नव्हती.

मात्र गेल्या काही दिवसांत राज आणि उद्धव यांच्यातली कटूता कमी झालीये. त्याचाच परिपाक म्हणून की काय सामनामध्य़े राज यांच्या मोर्चाला ठळक प्रसिद्धी मिळालीये. शिवसेना आणि मनसे यांच्यातही दरी कमी होत चालल्याचं यावरुनही स्पष्ट झालयं.

मनसेने मुंबई हिंसाचाराच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाचं तोंडभरून कौतुक, शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेने आपल्या ‘सामना’ या मुखपत्रात मनसेच्या मोर्चाचे कौतुक केले आहे. मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या बातमीला, ‘सामाना’मध्ये पहिल्या पानावर स्थान देण्यात आलं आहे. `पोलिसांवर हात उगारणाऱयांना तिथल्या तिथे फोडून काढा`, अशा मथळ्याची बातमी ठळक छापली आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर बहुदा प्रथमचं शिवसेनेकडून राज ठाकरेंचा छायचित्र पहिल्या पानावर दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंबद्दलचा शिवसेनेच्या मनात असणारा सॉफ्ट कॉर्नर दिसून आला आहे.

First Published: Wednesday, August 22, 2012, 14:16


comments powered by Disqus