राज ठाकरेंचा विरोध डावलला; फेरीवाल्यांचा मोर्चा निघालाच!

Last Updated: Thursday, January 24, 2013, 17:14

मुंबईतल्या फेरीवाल्यांनी आझाद मैदानात आज जोरदार आंदोलन केलं. सुमारे दोन हजार फेरीवाले या निदर्शनात सहभागी झाले होते.

फेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 09:13

पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

`अमर जवान` स्मारकाचे नुकसान, तरूण जेरबंद

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 12:43

मुंबईतील हिंसाचारावेळी `अमर जवान` स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. या तरूणाची सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर ओळख पटली आहे.

अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज

Last Updated: Thursday, August 23, 2012, 19:11

राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यावर आपले ठाम मत मांडले.

राज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 14:16

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिलीये. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापलीये. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना सामनात प्रसिद्धी मिळत नव्हती.

...तेव्हा कुठे गेले दलित नेते?

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 17:39

लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं. बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रियाही आधी मुंबईत. नंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केलं त्यांनी ?

आबा लाज असेल तर राजीनामा द्या- राज ठाकरे

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 17:43

मला महाराष्ट्र धर्माची भाषा कळते. पोलिसांवर आणि भगिणींवर कोणी हात उचलत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची आम्ही गैर करणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी आर आर आबा तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान राज यांनी गृहमंत्री पाटील यांना दिले.

काय म्हणाले राज?

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 16:25

राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.

राज ठाकरे यांचे भाषण सुरू

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 16:04

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत. यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १३० मिनिटांनी चौपाटीकडे रवाना झाले आहेत. गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला जाब विचारणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशीच मागणी मनसेने केली आहे.

राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated: Sunday, August 12, 2012, 09:29

मुंबईत सीएसटी परिसरात शनिवारी अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरूय..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र, राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता'

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 14:37

राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समिती आझाद मैदानात दुपारी दोन वाजता आंदोलन करणार आहे.