विंदू सिंगच्या अटकेवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया Raj thackeray`s reaction on Vindu Dara Singh

'बापाचा मुक्का कळला नाही...'

'बापाचा मुक्का कळला नाही...'
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विंदू दारा सिंगच्या अटकेवर राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. "बापाच्या बॉक्सिंगमधला मुक्का कळाला नाही, मात्र क्रिकेटमधला बुकी कळाला" अशा शब्दांत राज ठाकरेंनी विंदू दारा सिंगच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारा‍ सिंगला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विंदू दारा सिंगला अटक केली आहे. बुकीजसोबत असलेल्या संबंधामुळे विंदूला अटक करण्यात आली आहे.

बुकी रमेश व्याससोबत त्याचे संबंध असल्याचा संशय आहे. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात प्रथमच बॉलीवूडमधील एखाद्या कलावंताला अटक करण्यात आली आहे. विंदूच्या अटकेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013, 22:10


comments powered by Disqus