राज ठाकरेंनी टाळी द्यावी- रामदास आठवले Ramdas Athavale on Raj & Uddhav

राज ठाकरेंनी टाळी द्यावी- रामदास आठवले

राज ठाकरेंनी टाळी द्यावी- रामदास आठवले
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महायुतीत राज ठाकरेंनीही सहभागी व्हावं, असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. कुर्ल्यामध्ये संकल्प मेळाव्यात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना हे आवाहन केलं आहे.

राज आणि उद्धव या भावांनी टाळी वाजवावी, असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं. राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत बऱ्याचवेळा रामदास आठवलेंची खिल्ली उडवली आहे. तसंच इतके दिवस रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना महायुतीत सामिल करून घेण्यास विरोध होता. मनसेला युतीमध्ये प्रवेश दिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असं म्हणणाऱ्या रामदास आठवलेंनी आता मनसेला महायुतीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. रामदास आठवलेंनी स्वागताची भूमिका घेत राज ठाकरेंना आवाहन केलं आहे. मी राज आणि उद्धव यांच्या मध्ये असून त्यांना टाळी देण्यासाठी मी मदत करेन असं यावेळी रामदास आठवले म्हणाले.

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचा संकल्प मेळावा कुर्ल्यात सुरु आहे. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले सभेला संबोधलं. यापूर्वी सामना या मुखपत्रातून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना टाळी देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र राज ठाकरेंनी हे आवाहन धुडकाऊन लावलं होतं. राज आणि उद्धव एकत्र यावेत, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. रामदास आठवलेंनीही यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकत मनसेला आवाहन केलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, May 26, 2013, 21:42


comments powered by Disqus