इंदू मिलप्रकरणी तावडे, आठवले पोलिसांच्या ताब्यात Ramdas Athavale, Vinod Tawade arrested for Indu Mill

इंदू मिलप्रकरणी तावडे, आठवले पोलिसांच्या ताब्यात

इंदू मिलप्रकरणी तावडे, आठवले पोलिसांच्या ताब्यात
www.24taas.com, मुंबई

इंदू मिलच्या जागेसाठी आंदोलन करणारे भाजप नेते विनोद तावडे आणि रिपाई नेते रामदास आठवले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलय. इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं तसंच इंदूमिलची जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी हे आंदोलन सुरू होतं.

शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या वतीनं मुंबईतल्या चेंबूर येथील पांजरपोळ नाक्यावर आंदोलन करण्यात येतं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते या आंदोलनाला अनुपस्थित आहेत.

तर विक्रोळी कांजुरमार्ग डंम्पिंग ग्राऊंडमुळे विक्रोळी कन्नमवार नगरमधील रहिवासी प्रचंड हैराण आहेत,परिसरात आजारी पडण्याचं प्रमाण वाढलय. या डम्पिंग ग्राऊंडला विरोध करण्यासाठी आज मनसेनं अभिनव आंदोलन केलं. मुंबई महापालिका आणि राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी आमदार मंगेश सांगळे यांनी मुंडन केलं आणि रास्ता रोको करत स्वतःला अटक करुन घेतलं.

First Published: Monday, October 15, 2012, 18:46


comments powered by Disqus