Last Updated: Friday, November 23, 2012, 16:56
www.24taas.com, मुंबईकाँग्रेसच्या नयना सेठ आणि मनसेचे संदीप देशपांडेंचं डोकं फिरलं असून त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी इंदू मिलच्या स्मारकाप्रकरणी व्यक्त केलीए.
दोघांनाही पक्षातून काढून टाकावं अशी मागणीही त्यांनी केलीए. तसंच 29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. इंदू मिलच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्याची मागणी चुकीची असल्याचं मत रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केलंय.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचंच स्मारक होणं योग्य आहे, असंही राऊत म्हणालेत.
First Published: Friday, November 23, 2012, 16:38