Last Updated: Friday, January 18, 2013, 18:44
www.24taas.com, मुंबईजात दाखल्यावरून काढण्याच्या भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या भुमिकेवर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी चांगलीच टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेली भूमिका दलितविरोधी असल्याची टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. दाखल्यावरून जातीचा उल्लेख काढून टाकायला आरपीआयचा विरोध असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
जात ही सुद्धा दृष्टी राष्ट्रीयत्वच आहे, जातीचा विचार केला तर त्यात न्याय देण्याची पद्धत आहे, त्याची एक वेगळी अशी नियमावली आहे. ती एक वेगळी संस्कृती आहे. त्यामुळे भारतीय राष्ट्रीयत्व पुढे नेण्यासाठी जातीचा उल्लेख टाळला गेला पाहिजे. भारतीयत्वला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे, त्यामुळे शाळेच्याच दाखल्यातून जात काढून टाकण्याची गरज आहे. असं मत प्रकाश आंबेडकर यांनी `झी २४ तास`शी बोलताना आपलं मत व्यक्त केलं.
त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भुमिका ही दलित विरोघी आहे, दाखल्यावरून जात काढण्याविषयीच्या मताशी मी सहमत नाही, दाखल्यावरून जरी जात घालवली तरी मनातून जात कशी जाणार? असं म्हणत रामदास आठवले यांनी चांगलीच टीका केली आहे.
First Published: Friday, January 18, 2013, 16:24