Last Updated: Friday, January 18, 2013, 17:08
www.24taas.com, मुंबई‘फेरीवाल्यांवर दादागिरी करण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी पाठवावे’ अस आवाहन राज ठाकरेंना केलं आहे. तसेच आरपीआयचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना संरक्षण देतील, मनसेने दादागिरी केल्यास आरपीआय कार्यकर्ते फेरीवांल्यांसोबत असेल.` असं म्हणत आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे.
दादागिरीची भाषा मनसेसारख्या पक्षाला शोभणारी नाही, जर मनसेने दादागिरी केली तर त्याला दादागिरीने उत्तर मिळेल असं रामदास कदम यांनी राज ठाकरेंना ठणकावून सांगितले, त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचा समाचार घेतला आहे.
राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांच्या भूमिकेवर घेतलेल्या आक्षेपवर रामदास आठवले यांनी राज ठाकरेवर टीकास्त्र सोडलं आहे. फेरीवाल्यांनी जर आंदोलन केले तर मनसेस्टाईलने त्याची दखल घेतली जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते, त्यांच्या याच भूमिकेवर रामदास आठवले आक्षेप घेतला आहे.
First Published: Friday, January 18, 2013, 16:53