रश्मी ठाकरेंच्या कारचा अपघात, बाइकस्वार जखमी Rashmi Thcakeray`s car meets with an accident

रश्मी ठाकरेंच्या कारचा अपघात, बाइकस्वार जखमी

रश्मी ठाकरेंच्या कारचा अपघात, बाइकस्वार जखमी
www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कारच्या धडकेमुळे मोटर सायकल चालवणाऱ्या दोनजणांचा अपघात झाला. मुंबईमधील वांद्रे परिसरात कलानगर येथे ही घटना घडली.

काल रात्री आठच्या सुमारास कलानगरहून रश्मी ठाकरेंची कार दक्षिण मुंबईच्या दिशेने जात होती. ही कार रश्मी ठाकरेंचा ड्रायव्हर चालवत होता. यावेळी ड्रायव्हरच्या शेजारील सीटवर पोलीस कॉन्स्टेबल बसला होता.

या घटनेमध्ये बाइकस्वारांचीच चूक असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बाइकवरील दोन तरुणांनी सिग्नल तोडला असल्याचं ड्रायव्हरचं म्हणणं आहे. मात्र बाइकस्वार आपली कुठलीही चूक नसल्याचा दावा करत आहेत. बाइकवर बसलेल्यांची नावं शेर अली खान (२४) आणि महंम्मद साझिया खान अशी आहेत.

First Published: Tuesday, October 30, 2012, 11:17


comments powered by Disqus