राष्ट्रवादी युवती काँग्रेसची विभागीय फळी, rashtrawadi yuvati congress‬ ‪

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची विभागीय फळी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची विभागीय फळी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

युवती काँग्रेसच्या विभागीय पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, आमदार विद्या चव्हाण यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती करण्यात आली.

विभागीय पदाधिकाऱ्यांमध्ये अदिती नलावडे (मुंबई विभाग), अदिती तटकरे (कोकण विभाग), वर्षा चंद (औरंगाबाद विभाग), अर्चना घारे (पश्चिम महाराष्ट्र), अमृता पवार (उत्तर महाराष्ट्र), सक्षणा सलगर (दक्षिण मराठवाडा), मनिषा काटे (विदर्भ) आदी सात जणींची निवड करण्यात आलेय. त्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आलेय.

मुंबई येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय संघटकांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या वर्षभराच्या कालावधीत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने छेडछाडबंदी, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहे, गुटखाबंदी, सुरक्षित एस.टी. प्रवास, उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात `जेंडर फ्रेंडली` वातावरण असे युवतींच्या जिव्हाळ्याचे विविध विषय घेऊन काम सुरु केले आहे. राज्यातील विविध ठिकाणी या युवती संघटीतपणे काम करीत आहे, असे या निवडीनंतर प्रमुख आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 15:17


comments powered by Disqus