Reliance mobile tower causes Cancer रिलायन्सच्या मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर

रिलायन्सच्या मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर

रिलायन्सच्या मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मोबाईल टॉवरमुळे होणा-या रेडिएशनमुळे एकाच इमारतीतील चौघांना कॅन्सर झाल्याचा आरोप मुंबईच्या विलेपार्लेमधल्या रहिवाशांनी केलाय...त्या इमारतीसमोर रिलायन्स मोबाईल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. त्यामुळेच इमारतीतल्या रहिवाशांना कॅन्सर झाल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे..

मुंबईच्या विलेपार्ले परिसरातील हिनाकुंज इमारतीत राहणा-या ७४ वर्षीय जयश्रीबेन दवे यांना कॅन्सरने ग्रासलंय...गेल्या दोन वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत आहेत...जयश्रीबेन यांच्या प्रमाणेच हिनाकुंजमध्ये राहणा-या ८३ वर्षीय पद्माबेन शहा यांनाही कॅन्सरने ग्रासलंय..तीन महिन्यापूर्वीचं पद्माबेन यांना कॅन्सर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय....५८ वर्षीय हंसा शाह यांना २००९मध्ये कॅन्सरचा सामना करावा लागला होता... हिनाकुंजमध्ये रहिवासी असलेल्या जयश्रीबेन, पद्माबेन , हंसा शाह यांची अवस्था पहाता या इमारतीतील रहिवाशांना जणू कॅन्सरचा शापचंलागलाय... हिनाकुंजच्या शेजारीच असलेल्या रिलायन्स ग्राहक सेवा केंद्रावरील मोबाईल टॉवर याला जबाबदार असल्याचा आरोप हिनाकुंजमधील रहिवाशांनी केलाय..
मोबाईल टॉवरच्या रेडियेशनमुळेच या इमारतीत राहणा-या चौघांना कॅन्सर झाल्याचा आरोप हिनाकुंजमधील रहिवाशांनी केलाय.. 2008 मध्ये हा मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून रिलायन्स कंपनीने मात्र रहिवाशांचा आरोप फेटाळून लावलाय. या मोबाईल टॉवर संदर्भात हिनाकुंजमधील रहिवाशांना महानगरपालिका आणि रिलायन्स कंपनीकडं वारंवार तक्रार केली मात्र त्यांची कुणीही दखल घेतली नाही...

मोबाईल टॉवरमुळे होणा-या रेडिएशन संदर्भात लोकांच्या तक्रारी वाढत असून याबाबत लवकरच धोरण ठरवणार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलंय...मात्र ते धोरण कधी अंमलात येणार हाच खरा प्रश्न आहे......

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 30, 2013, 23:09


comments powered by Disqus