Last Updated: Monday, August 19, 2013, 10:07
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईसोमवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण होतेय. रुपयाच्या घसरणीमुळं त्याचा परिणाम सेंसेक्सवरही झालाय. शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरलाय.
शुक्रवारी सेन्सेक्स आणि रुपयात जोरदार घसरण झाली होती. त्यानंतर शनिवार, रविवार बाजार बंद होता. मात्र सोमवारी सकाळी बाजार सुरू होताच बाजाराला चांगलाच दणका बसलाय. आधी रूपया कोसळला. रुपयाचे दर प्रति डॉलर ६२.३५ इतका घसरलाय. त्याचा परिणाम आता शेअर बाजारावरही पडलाय.
शेअर बाजारही कोसळला असून शेअर बाजार सकाळच्या पहिल्या सत्रात तब्बल २०० अंशांनी घसरलाय. तर निफ्टीतही ८५ अंशांनी घसरण झालीय. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये चांगलंच संभ्रमाचं वातावरण आहे.
मात्र याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरवाढीवर होतोय. सोन्याचा दर ३१ हजारांवर गेलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 19, 2013, 10:07