Last Updated: Friday, May 30, 2014, 16:36
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली मुंबईतल्या कॅम्पा कोला कंपाऊंडमधल्या रहिवाशांना शेवटच्या टप्यात सुप्रीम कोर्टानं किंचित दिलासा दिलाय.
मागील आठवड्यात रहिवाशांची याचिका फेटाळल्यानंतर आज नव्यानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मात्र सुप्रीम कोर्ट राजी झाले आहे. त्यामुळं आता मंगळवारी 3 जूनला यावरील सुनावणी होणाराय. नव्याने याचिका दाखल करून घेतली असली तरी सुप्रीम कोर्टानं अनधिकृत 35 मजले पाडण्याविषयीचा जुना आदेश रद्द केलेला नाही.
सुप्रीम कोर्टानं रहिवाशांना 31 मेपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेनं रहिवाशांना 2 जूनपर्यंत चाव्या ताब्यात देण्यास सांगितलंय. पण, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही या इमारतीमधील एकही घर रिकामं झालेलं नाही. परंतु आता सुप्रीम कोर्टानं याचिका दाखल करून घेतल्यानं महापालिकेची कारवाईही 3 जूनपर्यंत स्थगित होण्याची शक्यता आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 30, 2014, 16:36