स्कूलबसनं चिरडलं, मृतांध्ये गर्भवती महिलेचाही समावेश, school bus accident in bhaynder

स्कूलबसनं चिरडलं, गर्भवती महिलेचा मृत्यू, ४ जखमी

स्कूलबसनं चिरडलं, गर्भवती महिलेचा मृत्यू, ४ जखमी
www.24taas.com, भाईंदर

भरधाव स्कूलबसने पाच जणांना चिरडलंय. यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. तर इतर चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं समजतंय. भाईंदरच्या आंबेडकरनगरमध्ये ही घटना घटना घडलीय.

भाईंदरच्या नॅशनल स्कूलची ही बस आहे. सोमवारी रात्री उशीरा ही घटना घडलीय. भाईंदरच्या आंबेडरकरनगरमधून जात असताना ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटला आणि या बस रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर चाल करून गेली. बेसावध लोकांना या घटनेचा अंदाजही यायला वेळ मिळाला नाही आणि या बसखाली ५ जण चिरडले गेले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे, एका गर्भवती महिलेचाही यामध्ये समावेश आहे.

अपघातानंतर तातडीनं जखमींना जवळच्याच कस्तुरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतू, उपचारादरम्यान या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर स्कूलबसचा ड्रायव्हर फरार झालाय. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केलाय.

First Published: Tuesday, March 26, 2013, 08:49


comments powered by Disqus