Last Updated: Monday, March 18, 2013, 14:40
www.24taas.com, मुंबईशिक्षा म्हणून संडास धुवायला लावल्याने एका शिक्षिकेविरोधात नाराजी व्यक्त होत होती. विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याप्रकरणी दादरमधल्या द एन्टोनिओ डीसिल्वा शाळेतल्या एका शिक्षिकेला निलंबित करण्यात आलंय.
बुधवारी वर्गात गोंधळ घातला म्हणून शिक्षिकेनं दोघा विद्यार्थ्यांना शाळेचे शौचालय साफ करण्याची शिक्षा दिली. या विद्यार्थ्यांच्या पालकांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली. त्यानंतर शिवसेनेना कार्यकर्त्यांनी याप्रकरणी थेट शाळेत जाऊन शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली.
वेळी शिवसैनिक आणि शाळा प्रशासनामध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर चौकशी पूर्णहोईपर्यंत शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई शाळा प्रशासनानं केलीय.
First Published: Monday, March 18, 2013, 14:40